• vdmeghana@swasthyaholistic.in
  • +91 932 561 2134

नैसर्गिक या शब्दाचा अर्थ निसर्गात आपोआप उत्पन्न झालेले…. सध्या विचार केला तर असे कोणतेच पदार्थ आपल्याला उपलब्ध होऊ शकत नाहीत आणि झालेच तर ते वाढत्या लोकसंख्येसाठी अपुरेच ठरतील. त्यामुळे, जे पदार्थ सुपीक जमीनीत, नैसर्गिक खतांचा वापर करून तयार केले जातात आणि नैसर्गिक पद्धतीनेच टिकवले जातात, असे पदार्थ सध्या “नैसर्गिक” म्हणून विकले जातात.

आपण घेण्यात येणाऱ्या आहाराचा आपल्या शरीरावर खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव पडत असतो. शरीरात वात, पित्त आणि कफ दोषांची निर्मिती, सर्व धातूंची निर्मिती ही शरीरात घेतलेल्या आहाराने होत असते. शरीरात होणारे दीर्घकालीन रोग जसे Diabetes, Blood Pressure, Cancer, तसेच विविध प्रकारचे त्वचारोग, आणि Deficiencies हे सर्व घेतल्या जाणाऱ्या आहाराचे परिणाम असतात. सात्विक व्यक्तीला सात्विक आहाराची आवश्यकता असते. परंतु, सात्विक आहार, स्वास्थ्य उत्पन्न करणारा आहार कोणता? हेच आपल्याला माहीत नसते.

त्यामुळे असे पदार्थ जे शरीरसाठी त्रासदायक नसतील आणि शरीरातील धातूंची योग्य उत्पत्ती करतील असे पदार्थ आपल्यासाठी उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.

त्यासाठी नवीन संकल्पना सुरू करत आहोत…”स्वास्थ्य आहार”….यात आपण विकत घेतलेल्या पदार्थाचे गुणधर्म त्यावर लिहिलेले असतील. त्या पदार्थाने शरीरात होणारे सामान्य बदल/परीणाम (हे व्यक्ती, देश, काल यानुसार बदलू शकतात) लिहिलेले असतील.

यासाठी मी एक gform पाठवत आहे त्यात प्रॉडक्ट्सची साधारण यादी पाठवत आहे….आपल्याला कोणते प्रॉडक्ट्स् आवश्यक वाटतात, त्यावर आपण ✔️ करावे. ते प्रॉडक्ट्स् उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असेल.

असे पदार्थ उपलब्ध झाल्यावर आपल्याला कळवण्यासाठी आपला फोन नंबर आपण द्यावा ही विनंती. 🙏

Gform link –

https://forms.gle/twiPdWgrn9LMe3477